शिवज्योतीसाठी दौड

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

घाटकोपर - शिवजयंती उत्सव समितीच्या शिवजयंती सोहळ्याला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. सोमवारी किल्ले शिवनेरी, जुन्नर ते घाटकोपर मुंबई अशा शेकडो किलोमीटरची दौड लावत शिवज्योत मुंबईत आणण्यात आली. या शिवज्योत सोहळ्यात प्रथमच तरुणांबरोबर महिला आणि तरुणींनीही सहभाग घेतला. तसेच यामध्ये जुन्नर आणि मुंबईतील अनेक मान्यवरही सहभागी झाले होते. मुंबईत दाखल झालेल्या या शिवज्योतीची बुधवारी, 15 मार्चला पारंपरिक पद्धतीने शिवरथ यात्रा काढली जाणार आहे. घाटकोपरच्या पारशीवाडी विभागात ही यात्रा सुरू होऊन, भटवाडी, घाटकोपर स्थानक परिसरातून अमृतनगर सर्कल येथे समाप्त होणार आहे. यात सालाबादप्रमाणे संपूर्ण घाटकोपरमधून हजारो शिवभक्त सामिल होतील अशी आशा उत्सव समितीचे अध्यक्ष कल्पेश शेलार यांनी व्यक्त केली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या