बोरीवली - पैसे मागितल्याने एका दुकानदारास मारल्याची घटना बोरीवलीच्या टाटा पावर हाऊस त्रिमूर्ती पाटील कंपाऊंडमध्ये घडली. रमेश गवळी असं आरोपीचं नाव असून, तो आणि त्याचे साथीदार फरार आहेत. पोलिसांनी तिघा आरोपींवर कलम ३२६,३२४,५०४,५०६,५०६ (२),३४ नुसार गुन्हा दाखल केला असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मण गौडा यांचे किरणामालाचे दुकान आहे. 12 मार्चला संध्याकाळी त्यांच्या दुकानात रमेश गवळी आला आणि त्याने 500 रुपयांची देणगी द्या अशी मागणी लक्ष्मण गौडा यांच्याकडे केली. मात्र 500 रुपयांऐवजी दुकानात असलेल्या पुनीतने 50 रुपये देवू केल्याने त्याने पुन्हा येतो आणि सांगतो अशी धमकी देऊन गवळी तिथून निघून गेला.