पतीच्या उदंड आयुष्यासाठी करवा चौथ

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

मुंबई - येत्या बुधवारी उत्तर भारतीयांचा करवा चौथ आहे. या दिवशी महिला आपल्या पतीच्या उदंड आयुष्यासाठी निर्जळ उपवास करतात. पतीला त्यांच्या कामात यश, समृद्धी आणि भरभरुन आयुष्य मिळावं हाच या उपवास मागचा उद्देश आहे. या दिवशी शंकर, पार्वती, कार्तिकेय, गणेश, आणि चंद्र यांची पूजा केली जाते. चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला पाणी दाखवून महिला जेवतात. पूजा झाल्यानंतर मातीच्या मडक्यात तांदूळ, उडीद डाळ, सौभाग्याचं लेण ठेवून वयस्कर महिलेला ते मडके देऊन आशिर्वाद घेतला जातो. या वर्षी करवा चौथ 19 ऑक्टोबरला असून पूजेचा शूभ मुहूर्त संध्याकाळी 5 वाजून 46 मिनिट ते 6 वाजून 50 मिनिटांचा आहे. तर, चंद्राला पाणी दाखवण्याचा 8 वाजून 50 मिनिटांचा मूहूर्त आहे. त्यानंतर पती आपल्या हातांनी पत्नीला जेवणाचा पहिला घास भरवण्याची पद्धत आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या