विचारे कुरियरच्या कामगारांचे कामबंद आंदोलन

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

वडाळा - विचारे कुरियरच्या कामगारांना कंपनीच्या वतीनं दिला जाणारा बोनस 12% ऐवजी 8.33% करण्यात आला असून हा बोनस टप्प्याटप्प्यांत देण्यात येणार आहे. त्यामुळे संतप्त कामगारांनी मंगळवारी वडाळा पश्चिम येथील पाच उद्यानात आंदोलन केलं.

विचारे एक्सप्रेस लॉजिस्टिक कंपनीशी 2,100 कामगार महाराष्ट्र समर्थ कामगार संघटना, भारतीय कामगार सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या तीन संघटनेशी जोडली गेली आहेत. मात्र कंपनीनं महाराष्ट्र समर्थ कामगार संघटना आणि भारतीय कामगार सेना या दोन संघटनांबरोबर 2014 ते 2018 सालासाठी करार केला, त्या करारात दिवाळी पूर्वी 12% बोनस कामगारांना देण्याचं ठरलं होतं. परंतु कंपनीनं ऐन दिवाळीत 12% बोनस न देता केवळ 8.33% इतकाच बोनस कामगारांना देता येईल, असं पत्र तिन्ही संघटनांना पाठवलं. त्यामुळे

या तिन्ही संघटनांच्या नेतृत्वाखाली 2100 महिला आणि पुरुष कामगारांनी मिळून वडाळा येथे आंदोलन केलं, असून जो पर्यंत 2014 सालच्या करारानुसार बोनस पूर्ववत होत नाही, तो पर्यंत कंपनीच्या कार्यालयात कामबंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचं भारतीय कामगार सेना युनिट सचिव निवास शिंदे यांनी सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या