शिवडीत कोळी फूड फेस्टिव्हल

शिवडी - गरमागरम तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, सुका चिकन , मटण, कोंबडी वडे, कोळंबी, खेकडा, बांगडा, सुरमई आणि हलवा हाहा...आलं ना तुमच्या ही तोंडाला पाणी..ही झणझणीत मेजवानी शिवडीत आयोजित केलेल्या कोळी फूड फेस्टिव्हलमध्ये ठेवण्यात आली होती. या फेस्टिव्हलला मोठ्या संख्येने खवय्यांनी हजेरी लावली होती.

शिवडी किल्ला कोलगेट कंपनी येथे पहिल्यांदाच कोळी फूड फेस्टिव्हल 2016 चं आयोजन करण्यात आलं होतं. कोळी समाज को. ऑप. हॉ. सोसायटी आणि आपली मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हे फूड फेस्टिव्हल आयोजित करण्यात आलं होतं. या फेस्टिव्हलला मोठ्या संख्येनं खवय्यांनी हजेरी लावली होती. संस्कृती आणि परंपरा जपणाऱ्या या कोळी बांधवांनी आपल्या संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी या फेस्टिव्हलचे आयोजन नंदकुमार शिवडीकर आणि व्हाईस अँडमिरल आय. सी राव यांनी केले होते. तर या लज्जतदार मेजवानीचा स्वाद अधिक चविष्ट व्हावा, यासाठी प्रसिद्ध कोळी गीतकार दादुस यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यांनी आपल्या कोळी गीतांनी खवय्यांचं मनोरंजन केलं. या कार्यक्रमाला खासदार राहुल शेवाळे, नगरसेविका श्वेता राणे, सहायक पोलीस आयुक्त सुनिता नाशिककर, प्रभाकर कोळी, भास्कर शिवडीकर, गिरीश वैती, नील शिवडीकर, जागृती वैती, भालचंद्र कोळी उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या