खवय्यांची मेजवानी, कोकणी महोत्सव

जोगेश्वरी - कोकणी मालवणी पदार्थ म्हणजे खवय्यांची मेजवानीच. हीच मेजवानी जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी जोगेश्वरी पूर्वेकडील शामनगर तलावाजवळ आयोजित केली आहे.

शनिवारपासून सुरू झालेल्या या मराठमोळ्या उत्सवाचा धुमशान १४ नोव्हेंबरपर्यंत रंगणार आहे. सुमारे 25 वर्षांपासून या मालवणी महोत्सवाचं आयोजन केलं जातं.

यामध्ये कोकणातील विविध नाट्यमंडळी आपली दशावरातील नाटकं सादर करणार आहेत. कोकणी आणि मालवणी सुकी मासळी, कोकणी मेवा आणि आंब्या - फणसाचे, काजू , करवंदाचे विविध खाद्यप्रकार आणि मालवणी कोकणी चमचमीत खाद्य पदार्थांचे स्टॉल या जत्रोत्सवात लागले आहेत. त्यामुळे खवय्यांसाठी तर ही सुखाची पर्वणीच आहे . शिवाय मराठमोळ्या संस्कृतीमधील विविध वस्तू आणि कपड्यांची 150 दुकानं इथे मांडली आहेत. तसंच या महोत्सवामुळे कोकणातील गावागावातल्या छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना चालना मिळाली आहे. यासह महिला बचत गटातील महिलांनासुद्धा इथं विविध उत्पादनांच्या विक्रीसाठी स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहे. यावेळी जास्तीत जास्त जणांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा असं राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी मुंबईकरांना आवाहन केलं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या