मुंबईतल्या या हॉटेलमध्ये मिळतोय मशिनमधून पिझ्झा

तुम्ही पिझ्झा वेंन्डिग मशिनविषयी कधी ऐकलं आहे का?  पिझ्झा वेंन्डिग मशीन इटालियन देशातच आढळून येतात. पण भारतात पहिल्यांदा या मशिनची सुरुवात झाली आहे ती मुंबईतल्या कांदिवलीतकांदिवलीतील एका हॉटेलमध्ये असं पिझ्झा वेंन्डिंग मशीन ठेवण्यात आलंय.

पिझ्झा वेन्डिंग मशीनची खासियत

'येस पिझ्झा' या हॉटेलनं भारतातलं पहिलं पिझ्झा वेंन्डिग मशीनला सुरुवात केली आहे. या मशिनमध्ये सुरुवातीला तुम्हाला एक टोकन लागणार आहे. टोकन टाकल्यानंतर समोर पर्याय येतात. त्या पर्यायांमध्ये तुम्हाला हवा असलेला पर्याय निवडायचासहाव्या मिनिटातच तुमच्यासमोर पिझ्झा आलेला असेल. तुम्हाला ४ प्रकारचे पिझ्झा मशिनमधून मिळतील. यात फक्त पिझ्झाच नाही तर पॉपकॉर्न आणि ज्यूस मिळतील. त्यात २ प्रकारचे पॉपकॉर्न आणि ३ प्रकारचे ज्यूस याचा समावेश आहे

कुठे

येस पिझ्झा, राज अाॅर्केड, पंचशील गार्डनजवळ, कांदिवली


हेही वाचा

चिझी, स्पायसी आणि डिझर्ट पिझ्झा


पुढील बातमी
इतर बातम्या