नाडकर्णी कप फुटबाॅल स्पर्धेत एअर इंडिया अजिंक्य

  • मुंबई लाइव्ह टीम & मुंबई लाइव्ह नेटवर्क
  • फुटबॉल

गतविजेत्या एअर इंडियाने अारसीएफ नाडकर्णी कप फुटबाॅल स्पर्धेच्या अंतिम फेरीत जोमाने मुसंडी मारत यूनियन बँक अाॅफ इंडियाचा २-१ असा पराभव करून जेतेपदावर नाव कोरले. चेंबूर येथील अारसीएफ काॅलनी ग्राउंडवर रंगलेल्या या सामन्यात यूनियन बँकेने बलाढ्य एअर इंडियाविरुद्ध दमदार कामगिरी करत ६६व्या मिनिटाला पहिल्या गोलची नोंद करत अाघाडी घेतली होती. स्काॅट डिसूझा याने हा गोल करत यूनियन बँकेला विजयासमीप अाणून ठेवले होते.

अखेरच्या क्षणी दोन गोल अाणि विजय

यूनियन बँकेला तगडा बचाव करून विजेतेपद मिळवण्याची संधी असताना एअर इंडियाने मात्र प्रतिस्पर्ध्याच्या बचावाला सुरूंग लावला. प्रतिस्पर्ध्यांवर सातत्याने दडपण अाणतानाचा फायदा उठवत सामना संपायला दोन मिनिटे शिल्लक असताना एअर इंडियाने गोल करून बरोबरी साधली. प्रमाेद पांडे याच्या गोलमुळे सामन्यात रंगत निर्माण झाली. अतिरिक्त वेळेत एअर इंडियासाठी दुसरा गोल करून रिनाल्डो फर्नांडेसने अापल्या संघाला विजेतेपद मिळवून दिले. या कामगिरीसह एअर इंडियाने सलग दुसऱ्या वर्षी जेतेपद पटकावण्याची करामत साधली. विजेत्या संघाला नाडकर्णी चषक अाणि एक लाख रुपयांचे पारितोषिक देऊन गौरवण्यात अाले.

पुढील बातमी
इतर बातम्या