रणवीर सिंग बनला इंग्लिश प्रीमिअर लीगचा ब्रँड अॅम्बेसेडर

बाॅलीवूड स्टार रणवीर सिंगच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला अाहे. रणवीरची इंग्लिश प्रीमिअर लीगच्या भारतातील ब्रँड अॅम्बेसेडरपदी नियुक्ती करण्यात अाली अाहे. रणवीर अाता प्रीमिअर लीग अाणि त्यांच्या कम्युनिटी उपक्रमांचा प्रसार भारतात करणार अाहे.

रणवीरशी अधिकृत भागीदारी

प्रीमिअर लीगने भारतीय सुपरस्टार रणवीर सिंगशी अधिकृत भागीदारी केली अाहे. रणवीर हासुद्धा फुटबाॅलचा प्रचंड मोठा चाहता असून तो भारत अाणि जागतिक स्तरावर प्रीमिअर लीगच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार अाहे. बाजीराव मस्तानी अाणि बेफ्रिकेसारख्या चित्रपटांत काम करणारा रणवीर हा अार्सेनलचा फॅन असून प्रीमिअर लीगचे सामने उत्सुकतेने पाहत असतो. अापल्या अॅम्बेसेडरपदाच्या भूमिकेत तो लीगच्या कम्युनिटी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी होणार अाहे.

तळागाळात फुटबाॅलचा प्रसार करणार

प्रीमिअर लीगने भारतातील उच्च वर्गात अाणि तळागाळात फुटबाॅलचा प्रसार करण्याची बांधीलकी जपली अाहे. त्यानुसार २००७ पासून प्रिमिअर स्किल्स प्रोग्रॅमचे अायोजन केले जात अाहे. प्रीमिअर लीग हा जागतिक दर्जाचा प्रशिक्षक अाणि रेफ्री विकास कार्यक्रम अाहे. ब्रिटिश कौन्सिल, भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) अाणि इंडियन सुपर लीग (अायएसएल) यांच्या भागीदारीतून हा कार्यक्रम राबवला जातो. प्रीमिअर स्किल्स कार्यक्रमांतर्गत अातापर्यंत १००० स्थानिक प्रशिक्षक अाणि रेफ्रींना प्रशिक्षण देण्यात अाले अाहे.

पुढील बातमी
इतर बातम्या