लीह पूनावालाच्या हॅटट्रिकमुळे बाॅडीलाइन एफसीचा दमदार विजय

  • मुंबई लाइव्ह टीम & मुंबई लाइव्ह नेटवर्क
  • फुटबॉल

वांद्रेच्या डेमाँटे पार्क रिक्रिएशनल ग्राऊंडवर सध्या पुरुष अाणि महिला फुटबाॅलचा थरार सुरू अाहे. २५व्या वांद्रे जिमखाना अोपन रिंक फुटबाॅल स्पर्धेत बाॅडीलाइन एफसीची स्ट्रायकर लीह पूनावाला हिने हॅटट्रिक साजरी केली अाणि उपस्थितांची मने जिंकली. तिच्या हॅटट्रिकच्या जोरावर बाॅडीलाइन एफसीने सेंट ज्यूड स्पोर्टस क्लबचा ५-० असा धुव्वा उडवत विजयी सलामी दिली. किम्बर्ली फर्नांडेस अाणि रिया डिसूझा यांनी प्रत्येकी एक गोल करत लीहला चांगली साथ दिली.

पूजा धुमाळचा गोल निर्णायक

दुसऱ्या एका सामन्यात, फुटबाॅल स्कूल अाॅफ इंडियाच्या विजयात पूजा धुमाळचा गोल निर्णायक ठरला. तिच्या या गोलमुळे फुटबाॅल स्कूल अाॅफ इंडियाने काॅम्पेनरोस एससीवर १-० असा विजय मिळवत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. वरिष्ठ पुरुषांच्या गटात, मालाडच्या गोल्डन बाॅइजने वाकोल्याच्या होली क्राॅसचे अाव्हान ३-० असे परतवून लावले. करण सावंतचे दोन गोल अाणि कुणाल नागवेकरचा एक गोल त्यांच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरला.

पुढील बातमी
इतर बातम्या