मुंबई सिटी एफसी आयएसएलसाठी सज्ज

इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल सामन्यांना येत्या रविवारपासून सुरुवात होणार आहे. बंगळुरू एफसी विरुद्ध होणाऱ्या पहिल्या सामन्यासाठी मुंबई संघ सज्ज झाला आहे, असे मुंबई सिटी एफसीचे प्रशिक्षक गुमारेस यांनी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात सांगितले. यावेळी प्रशिक्षकासोबत मुंबई सिटी एफसीचा मालक अभिनेता रणबीर कपूर हा देखील उपस्थित होता.

सुनिल छेत्री यंदा बंगळुरू संघातून खेळणार

गेल्या वर्षी उपांत्य फेरीपर्यंत पोहोचलेला मुंबई सिटी एफसी संघ यावेळी कशी कामगिरी करेल? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. शुक्रवारपासून सुरू झालेल्या आयएसएलमधील यंदाच्या मोसमात मुंबईचा पहिला सामना बंगळुरू संघासोबत त्यांच्या घरच्या मैदानावर होणार आहे. विशेष म्हणजे यापूर्वी मुंबईकडून खेळलेला सुनिल छेत्री यंदा बेंगळुरू संघातून खेळणार आहे. त्यामुळे चॅम्पियन बेंगळुरू संघाच्या आक्रमक खेळाचे आव्हान मुंबईसमोर असणार आहे. मुंबईचा दुसरा सामना २५ नोव्हेंबरला अंधेरी येथील स्पोर्ट्स क्लब येथे होणार असून तिसरा सामना २९ नोव्हेंबर रोजी पुणे संघाबरोबर होणार आहे.

'येत्या मोसमासाठी आमचा संघ सज्ज झाला आहे. इतर संघ कसे आहेत ते आम्हाला माहीत नाही. पण आमचा संघ मजबूत आहे. आमच्याकडे अमरिंदर सिंग आणि अरिंदम भट्टाचार्य यांच्यासारखे दोन उत्कृष्ट गोलरक्षक आहेत. यासोबतच कुणाल सावंत हा तरुण खेळाडू गोलरक्षक देखील आमच्यासोबत आहे. यामुळे मला नक्की विश्वस आहे, आम्ही चांगली कामगिरी करू', असे मुंबई संघाचे प्रशिक्षक गुमारेस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या