राज्यात बुधवारी ९ हजार ७७१ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर १० हजार ३५३ रुग्ण बरे झाले आहेत. तसंच १४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के इतका आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ५८ लाख १९ हजार ९०१ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०२ टक्क्यांवर पोहोचले आहे
राज्यात १ लाख १६ हजार ३६४ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. राज्यात ६ लाख १७ हजार ९२६ रुग्ण होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तर ४ हजार १७३ रुग्ण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
मुंबईत ६९२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ६८० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. बरे झालेल्या रुग्णांची एकूण आकडा ६ लाख ९६ हजार १०५ इतका झाला आहे. बरे झालेल्या रुग्णांचं प्रमाण ९६ टक्के आहे. सध्या मुंबईत ८ हजार ३५१ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण दुप्पटीचा वेग हा ७१६ दिवसांवर पोहोचला आहे. २३ जून ते २९ जूनदरम्यान कोविड रुग्ण वाढीचा दर हा ०.००९ टक्के इतका होता.
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी १६ लाख ३७ हजार ९५० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६० लाख ६१ हजार ४०४ (१४.५६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६ लाख १७ हजार ९२६ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ४ हजार १७३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील
ठाणे मंडळ एकूण २१६४
नाशिक मंडळ एकूण ५३०
पुणे मंडळ एकूण २६८२
कोल्हापूर मंडळ एकूण ३७३७
औरंगाबाद मंडळ एकूण १३३
लातूर मंडळ एकूण २४६
अकोला मंडळ एकूण १९१
नागपूर एकूण ८८