नवी मुंबईत शनिवारी कोरोनाचे नवीन १४३ रुग्ण

नवी मुंबईत शनिवारी (२८ नोव्हेंबर) कोरोनाचे नवीन १४३ रुग्ण सापडले आहेत. तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ४७,९९० झाली आहे. 

शनिवारी बेलापूर ३२, नेरुळ १६, वाशी १६, तुर्भे १३, कोपरखैरणे २८, घणसोली १४, ऐरोली २३,  दिघामध्ये १ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात १४० जणांनी कोरोनावर मात केली आहे. बेलापूर ५०, नेरुळ २८, वाशी ८, तुर्भे १६, कोपरखैरणे १०, घणसोली ११, ऐरोली १५, दिघामध्ये २रुग्ण बरे झाले आहेत.  

बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४५,३९८ झाली आहे. तर मृतांचा आकडा ९७९ झाला आहे. नवी मुंबईत सध्या १६१३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ९५ टक्के झाला आहे. 

दरम्यान, प्रतिजन किंवा आरटीपीसीआर चाचणीसाठी नमुने गोळा न केलेल्या नागरिकांचेही करोना निदान अहवाल तयार केल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबई महापालिकेत उघडकीस आला आहे. त्यात काही वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नावेही अहवाल तयार करण्यात आले आहेत.

दिवाळीपूर्वी शहरात कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली होती. दिवसाला तीनशे ते चारशे असलेली रुग्णसंख्या शंभरच्या खाली आली होती. मात्र, कोरोना रुग्ण संख्या दिवाळीनंतर पुन्हा वाढली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात रुग्ण संख्या हळूहळू कमी झाली. मात्र मृत्यूचे प्रमाण मात्र कायम होते. दिवाळीमध्ये अनेक नागरिक बाहेर पडले. खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी झाली. त्यामुळे रुग्णांची संख्या पुन्हा वाढण्यास सुरूवात झाली.  


पुढील बातमी
इतर बातम्या