पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी २२६ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी (२ सप्टेंबर) २२६ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत.  १९१ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर ७ मृत्यूंची नोंद झाली असून यामध्ये खारघरमधील ३ नावडे येथील २, खांदा कॉलनी आणि पनवेेल  येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश झाला आहे.  

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील ५२,  नवीन पनवेलमधील ३९, खांदा कॉलनीतील ९, कळंबोली-रोडपाली येथील ३६, कामोठ्यातील ४९, खारघरमधील ४,  तळोजा येथील १ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील ३३,  नवीन पनवेलमधील ३२, कळंबोली-रोडपाली येथील १३, कामोठ्यातील ६२, खारघरमधील ५०,  तळोजा येथील १ रुग्णांचा समावेश आहे. 

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण १२२२७ कोरोनाबाधित रूग्णांपैकी १०५२१ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून २९५ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे १४११ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. 


हेही वाचा -

सर्वाधिक कोरोनाच्या चाचण्या करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश

खासगी रुग्णालयात राखीव खाटा ठेवण्यास ३ महिन्यांची मुदतवाढ


पुढील बातमी
इतर बातम्या