covid-19 in Navi Mumbai: नवी मुंबईत सोमवारी कोरोनाचे नवीन २८६ रुग्ण

नवी मुंबईत सोमवारी कोरोनाचे नवीन २८६ रुग्ण सापडले आहेत. तर २ रुग्णांचा  मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ११ हजार ७१२   झाली आहे. 

सोमवारी नवी मुंबईमध्ये आढळलेल्या रुग्णांमध्ये बेलापूर ३८, नेरुळ ६२, वाशी ३६, तुर्भे २२, कोपरखैरणे ३१, घणसोली ४३, ऐरोली ४३, दिघा येथील ११ रुग्णांचा समावेश आहे. तर २०४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

सोमवारी बेलापूर २२, नेरुळ ४२, वाशी १८, तुर्भे ६, कोपरखैरणे १७, घणसोली २६, ऐरोली ६०, दिघातील १३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७४१७ वर पोहोचली आहे.  नवी मुंबईत सध्या ३९५० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

 राज्यात सोमवारी ८२४० कोरोना रुग्णांची वाढ झाली. एकूण संख्या आता ३,१८,६९५ झाली आहे. सोमवारी ५४६०रु ग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १,७५,०२९ रुग्ण बरे होऊन  घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण १,३१,३३४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.


हेही वाचा -

Kalyan Dombivali Hotspot List : कल्याण-डोंबिवलीत 'हे' आहेत कंटेन्मेंट झोन

Containment Zones List Thane : ठाणेमध्ये 'हे' आहेत कंटेन्मेंट झोन


पुढील बातमी
इतर बातम्या