नवी मुंबईत सोमवारी कोरोनाचे नवीन ३७ रुग्ण

नवी मुंबईत सोमवारी (१८ जानेवारी) कोरोनाचे नवीन ३७ रुग्ण सापडले आहेत. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ५२ हजार २३७ झाली आहे.

नवी मुंबईमध्ये आढळलेल्या रुग्णांमध्ये बेलापूर ५, नेरुळ ५, वाशी ३, तुर्भे ५, कोपरखैरणे ८, घणसोली ३, ऐरोली येथील ८ रुग्णांचा समावेश आहे. तर १०० जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

बेलापूर १५, नेरुळ २१, वाशी ७, तुर्भे १४, कोपरखैरणे १०,  घणसोली ११, ऐरोली १६, दिघा येथील ६  रुग्ण बरे होऊन घरी गेले. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५०,३४२ झाली आहे. तर मृतांचा आकडा १०७५ झाला आहे. नवी मुंबईत सध्या ८२० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ९६ टक्के झाला आहे. 


हेही वाचा -

सीएसएमटीच्या पुनर्विकासासाठी 'या' कंपन्या इच्छुक

वाहतूक पोलिसांच्या गणवेशावर लावले जाणार कॅमेरे


पुढील बातमी
इतर बातम्या