पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी ३९ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी (२१ जानेवारी) ३९ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ५२ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील ३,  नवीन पनवेल ६, खांदा काॅलनी ७, कळंबोली २, कामोठे ९, खारघर  ११, तळोजा येथील १ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल ९, नवीन पनवेल १०,  कामोठे १५, खारघर येथील १८ येथील  रुग्णांचा समावेश आहे. 

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २८४५३ कोरोनाबाधित रूग्णांपैकी २७४५७ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ६१९ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ३७७ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. 


हेही वाचा -

महिनाअखेरीस महाविद्यालये होणार सुरू?

लसीकरणासाठी महापालिकेनं दिली 'ही' सवलत


पुढील बातमी
इतर बातम्या