चिंताजनक! डेल्टा प्लसमुळे ५ जणांचा मृत्यू

राज्यात डेल्टा प्लस रुग्णांची (Delta Variant) संख्या आता ६६ वर पोहोचली आहे. तर ६६ रुग्णांपैकी ५ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात डेल्टा प्लस रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्यात आता डेल्टा प्लसची रुग्णसंख्या ६६ वर पोहोचली आहे. जळगावात सर्वाधिक १३ रुग्ण आहे. तर १९ ते ४५ वयोगटात सर्वाधिक लागण झाली आहे.

महिला आणि पुरुष रुग्णाची संख्या जवळपास सारखी आहे. धक्कादायक म्हणजे, ज्यांनी दोन्ही डोस घेतले असे १० रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. तर उर्वरीत ३१ जणांना कुठलीही लक्षणं नाहीत.

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अजूनही आटोक्यात आहे. शुक्रवारी राज्यात ५ हजार ८६१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर राज्यात शुक्रवारी ६ हजार ६८६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर १५८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ % एवढा आहे.

डेल्टा प्लस हा डेल्टा हा व्हेरियंट पहिल्यांदा भारतातच आढळला होता. व्हायरसच्या या नव्या प्रकारामुळे कोरोना किती घातक होऊ शकतो, याचा अंदाज अद्याप लावता आलेला नाही. भारतात नुकतंच मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेल उपचार पद्धतीला परवानगी मिळाली आहे.

दिल्लीतील सीएसआयआर- इन्स्टिट्युट ऑफ जीनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजीचे (IGIB) शास्रज्ञ विनोद स्कारिया यांनी रविवारी याबद्दल ट्विट केलं होतं. त्यांनी लिहिलं होतं,‘ हे म्युटेशन स्पाईक प्रोटीन SARS-CoV-2 मध्ये म्युटेशन झाल्यामुळे माणसाच्या शरीरातील पेशींमध्ये तो प्रवेश करू शकतो. सध्या भारतात K417N ची व्हेरिएंट फ्रीक्वेन्सी फार नाही. हे सिक्वेन्सेस प्रामुख्याने युरोप, आशिया आणि अमेरिकामध्ये सापडले आहेत.’ या वर्षी मार्चमध्ये पहिला सिक्वेन्स युरोपमध्ये सापडला होता.


पुढील बातमी
इतर बातम्या