आर्थररोड तुरूंगात कोरोनाचा शिरकाव, 77 कैदी तर 26 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

 मुंबईतल्या पोलिस प्रशासनाला ज्या गोष्टीची भिती होती. नेमके तेच झाले, कस्तुरबा रुग्णालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या आर्थररोड जेलमध्ये कोरोना या संसर्ग रोगाने शिरकाव केला आहे. या कारागृहातील 77  कैदी आणि 26 कर्मचाऱ्यांना कोरोना या महामारीची लागण झाल्याचे आता पुढे आले आहे.

 मुंबईत कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता, काही दिवसांपूर्वीच मुंबई उच्चन्यायलयाने राज्य सरकारकडे जैलमधील कैद्यांबाबत विचारपूस केली होती. त्यात त्यांनी जेलमधील कैद्यांमध्ये कोरोना संसर्ग आहे का?  अशी विचारणा केली होती. त्या पाश्वभूमिवर राज्य सरकारने कोरोनाची लक्षण असणाऱ्या 200 कैद्यांसह तेथील अधिकाऱ्यांचीही तपासणी केली होती. या तपासणीत 103 जणांचे रिपोर्ट पाँझिटिव्ह आले आहेत. या 103 रुग्णांमध्ये 77 कैदी आणि  26 कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

या 77 रुग्णांना शुक्रवारी जे.जे. रुग्णालय आणि जी.टी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जाणार आहे. हे गंभीर आरोपामधील कैदी असल्याने त्यांच्यावर लक्ष ठेवणे हा तितकेच गरजेचे आहे. तर 26 जेल कर्मचाऱ्यांवर दुसऱ्या शासकिय रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत. आर्थररोड जेल हे जगप्रसिद्ध असून या जेलमध्ये 800 कैद्यांना एकावेळी ठेवायची व्यवस्था आहे. माञ सध्या परिस्थितीत त्यात 2800 कैदी  ठेवण्यात आल्याचे कळते. माञ कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर सरकारने या तुरूंगातील तब्बल 1100 कैद्यांची जामीनावर मुक्तता केली होती.
पुढील बातमी
इतर बातम्या