मुंबईत गुरुवारी कोरोनाचे नवीन ५४० रुग्ण

मुंबईत गुरुवारी कोरोनाचे नवीन ५४० रुग्ण आढळले. तर ६२८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसंच १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

मुंबईत आतापर्यंत एकूण ७ लाख १ हजार १९५ रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत एकूण १५ हजार ५८६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९६ टक्के इतके आहे. तर रुग्णवाढीचा दर ०.०८ टक्के इतका खाली आला आहे. तसंच मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी आता ८५८ दिवसांवर गेला आहे.

मुंबईत गुरूवारी एकूण ३७ हजार ८०२  चाचण्या करण्यात आल्या. सध्या झोपडपट्टी व चाळींमध्ये ११ सक्रिय कंटेनमेंट झोन असून एकूण ६७ इमारती सील करण्यात आल्या आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या