राज्यात बुधवारी ५८ हजार ९५२ नवीन रुग्ण

राज्यात बुधवारी कोरोनाचे नवीन ५८ हजार ९५२ रुग्ण आढळले. तर २७८ मृतांची नोंद झाली आहे. नव्या रुग्णसंख्येमुळे एकूण रुग्णांचा आकडा ३५ लाख ७८ हजार १६० झाला आहे. यामध्ये ६ लाख १२ हजार ७० रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

 बुधवारी ३९ हजार ६२४ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत २९ लाख ५ हजार ७२१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.२१ टक्क्यांवर आलं आहे. आतापर्यंत २ कोटी २८ लाख २ हजार २०० नमुन्यांपैकी ३५ लाख ७८ हजार १६९ रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. सध्या २८ हजार ४९४ रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

महाराष्ट्राचा मृत्यूदर सध्या १.६४ टक्के इतका आहे. राज्यात दिवसभरात झालेल्या २७८ मत्यूंपैकी सर्वाधिक ५४ मृत्यू हे मुंबईत झाले आहेत. मुंबईत आजपर्यंत १२ हजार १४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या