नवी मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन ५९ रुग्ण

नवी मुंबईत मंगळवारी (१९ जानेवारी) कोरोनाचे नवीन ५९ रुग्ण सापडले आहेत. तर १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ५२ हजार २९६ झाली आहे

नवी मुंबईमध्ये आढळलेल्या रुग्णांमध्ये बेलापूर १६, नेरुळ १०, वाशी ८, तुर्भे ४, कोपरखैरणे २, घणसोली ३, ऐरोली येथील १६ रुग्णांचा समावेश आहे. तर ६६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

बेलापूर १२, नेरुळ १२, वाशी १७, तुर्भे १०, कोपरखैरणे ४,  घणसोली ३, ऐरोली  येथील ८  रुग्ण बरे होऊन घरी गेले. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५०,४०८ झाली आहे. तर मृतांचा आकडा १०७६ झाला आहे. नवी मुंबईत सध्या ८१२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ९६ टक्के झाला आहे. 

 नवी मुंबईतील ३१३ जणांना लस देण्यात आली होती. हे सर्वजण लसीकरणानंतर ठणठणीत असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला असून यातील तीन जणांना काही काळ लस टोचल्याच्या ठिकाणी दुखणे जाणवले असून काही प्रमाणात अस्वस्थता जाणवली होती. आठवडय़ात मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार या दिवशी लसीकरण करण्यात येणार आहे. गुरुवारी लसीकरण होणार नाही. 

पुढील काही दिवस दिवसाला चारशे जणांना लस देण्याचे नियोजन आहे. मात्र यातील काही जण बाहेरगावी आहेत, तसेच काहींना शारीरिक त्रास असल्याने कमी जणांचे लसीकरण होत असल्याचे पालिकेने सांगितले आहे.


हेही वाचा -

महापालिकेच्या शाळांमध्ये सुरू होणार सीबीएसई बोर्ड

महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसवर सीसीटीव्हीची नजर


पुढील बातमी
इतर बातम्या