मीरा-भाईंदरमध्ये आढळले ६२ नवे रुग्ण, एकाचा मृत्यू

मीरा भाईंदरमध्ये शुक्रवारी २७ नोव्हेंबर रोजी COVID 19 चे ६२ नवीन रुग्ण आढळले आहेत. मीरा-भाईंदर महानगरपालिका (MBMC)च्या म्हणण्यानुसार कोरोनामुळे शुक्रवारी १ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाची वाढते रुग्ण आणि मृत्यूची आकडेवारी एमबीएमसीसाठी निश्चितच चिंताजनक आहे. सरकार त्यापासून बचाव करण्यात गुंतलेलं असलं तरी, मीरा-भाईंदरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चाचला आहे.

मीरा-भाईंदरमध्ये आतापर्यंत कोरोनाचे एकूण २४ हजार ०१२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनामुळे  आतापर्यंत ७५६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

शुक्रवारी, मीरा-भाईंदरमध्ये ६२ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता कोरोना रुग्णांचा एकूण आकडा २४ हजार ०१२ वर पोहचला आहे. तसंच या आजारानं मृतांचा आकडा ७५६ वर पोहोचला आहे. शुक्रवारी, २९ लोक कोरोनातून बरे झाले आहेत. त्यानुसार बरे झालेल्या रुग्णांचा आकडा २२ हजार ६८१ च्या घरात गेला आहे.

मीरा भाईंदर या भागात कोरोना रुग्णांचा आकडा विभागल्यास सोमवारी भाईंदर पूर्वेतील १२, भाईंदर पश्चिममधील ०६ आणि मीरा रोडमधील ४४ रुग्ण नोंदवण्यात आली आहेत.


हेही वाचा

पुढील बातमी
इतर बातम्या