नवी मुंबईत गुरूवारी कोरोनाचे नवीन ६७ रुग्ण

नवी मुंबईत गुरूवारी (१४ जानेवारी) कोरोनाचे नवीन ६७ रुग्ण सापडले आहेत. तर १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ५१ हजार ९८८ झाली आहे.

नवी मुंबईमध्ये आढळलेल्या रुग्णांमध्ये बेलापूर ११, नेरुळ ८, वाशी ७, तुर्भे ६, कोपरखैरणे ८, घणसोली ११, ऐरोली १५,  दिघा येथील  १ रुग्णांचा समावेश आहे. तर ७९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

बेलापूर १०, नेरुळ १४, वाशी ६, तुर्भे ६, कोपरखैरणे ५,  घणसोली ९, ऐरोली २५,  दिघा येथील ४  रुग्ण बरे होऊन घरी गेले. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५०,०६१ झाली आहे. तर मृतांचा आकडा १०७२ झाला आहे. नवी मुंबईत सध्या ८५५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ९६ टक्के झाला आहे. 

नवी मुंबईत १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे.  पहिल्या दिवशी ५०० करोना योद्धय़ांना लस दिली जाणार असून यासाठी महापालिका प्रशासनाने तयारी केली आहे. पाच केंद्रांवर हे लसीकरण होणार आहे.  बुधवारी सायंकाळी नवी मुंबईत लस दाखल झाली आहे. पहिल्या टप्प्यात २१,२५० हजार करोना लशींच्या कुप्या पालिकेला प्राप्त झाल्या आहेत.

लसीकरणासाठी शहरात ५० लसीकरण केंद्रांची तयारी पालिकेने केली आहे. मात्र पहिल्या दिवशी यातील ५ केंद्रांवर लसीकरण होणार आहे. पहिल्या टप्प्यात करोनाकाळात आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय व खासगी आरोग्यकर्मीना लसीकरण केले जाणार असून १९ हजार ८५ करोना योद्धय़ांची नोंद पालिकेने केली आहे. 


हेही वाचा -

"सीरमसाठी भावनिक क्षण", पुनावाला यांनी शेअर केला टीमसोबत फोटो

‘फिल्मी स्टाईल’ने आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला


पुढील बातमी
इतर बातम्या