राज्यात कोरोनाचे ७ हजार ४३६ रुग्ण बरे

राज्यात बुधवारी कोरोनाचे नवीन ६ हजार १२६ रुग्ण आढळले. तर ७ हजार ४३६ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  तसंच १९५ रूग्णांचा मृत्यू झाला.

राज्यात आतापर्यंत एकूण ६१,१७,५६० रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९६.६९ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ टक्के एवढा आहे. 

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,८७,४४,२०१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,२७,१९४ (१२.९८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,४७,६८१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,९२८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ७२,८१० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या