'या' ५ भागातील ७५ टक्के नागरिकांमध्ये कोरोनाशी लढणाऱ्या अॅन्टीबॉडीज सापडल्या

कफ परेडमधील पाच झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाव्हायरससाठी ८०६ लोकांच्या अॅन्टीबॉडीज चाचण्या घेण्यात आल्या होत्या. त्यापैकी ६०५ लोकांची तपासणी सकारात्मक झाली आहे.

प्रभागातील पाच ठिकाणी हे सर्वेक्षण ५ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले. या सर्वेक्षणात असं दिसून आलं आहे की ७५ टक्के लोकसंख्येची अँटीबॉडीजसाठीची चाचणी सकारात्मक आहे. त्यामध्ये झोपडपट्ट्यांमध्ये ४५ टक्के आणि इमारतींमध्ये १८ टक्के अशी आहे. ही टक्केवारी पालिकेनं केलेल्या सेरो सर्व्हेपेक्षाही अधिक असल्याचं समोर आलं आहे.   

महानगरपालिकेनं यापूर्वी जाहीर केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, दुसऱ्या सेरो-सर्व्हेमध्ये असं दिसून आलं आहे की, झोपडपट्ट्यांमध्ये कोविड रुग्ण ४५ टक्के होते. तर शहरातील पहिल्या सेरो-सर्वेक्षणात ५७ टक्के होते. पहिल्या सर्वेक्षणात १६ टक्क्यांच्या तुलनेत इमारतींमध्ये १८ टक्क्यांच्या आसपास असल्याचं त्यात नमूद केलं आहे.

ऑगस्टच्या उत्तरार्धात आर-उत्तर (बोरिवली), एम-वेस्ट (मानखुर्द आणि गोवंडी) आणि एफ-उत्तर (वरळी आणि लोअर परेल) च्या प्रभागांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं. तथापि, दोन्ही फेऱ्यांमध्ये आरोग्य सेवेतील कर्मचार्‍यांमध्ये सिरो-व्याप्ती अंदाजे २७ टक्के होती.

दरम्यान, शनिवारी, २८ नोव्हेंबरला महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसचे ५ हजार ९६५ नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यात कोविडची आकडेवारी १८ लाख १४ हजार ५१५ इतकी आहे. सध्या ८९ हजार ९०५ सक्रिय रुग्ण आहेत. तर १६ लाख ७६ हजार ५६४ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत.


हेही वाचा

नवी मुंबईत शनिवारी कोरोनाचे नवीन १४३ रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत शनिवार ९१ नवीन कोरोना रुग्ण

पुढील बातमी
इतर बातम्या