राज्यात कोरोनाची दुसरी नियंत्रणात येत असल्याचं दिसून येत आहे. दैनंदिन रुग्णांची संख्या घटली आहे. मंगळवारी राज्यात ५ हजार ६०९ नवीन रुग्ण आढळले. तर ७ हजार ७२० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसंच १३७ जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील मृतांचा एकूण आकडा १ लाख ३४ हजार २०१ झाला आहे. राज्यात आतापर्यंत ६१,५९,६७६ रुग्ण झाले बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८ टक्के झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,९९,०५,०९६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,६३,४४२ (१२.७५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,१३,४३७ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये तर २,८६० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६६ हजार १२३ वर आली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १३ हजार ८९२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्याखालोखाल ७ हजार २९७ अॅक्टिव्ह रुग्ण सांगली जिल्ह्यात आहेत. सातारा जिल्ह्यात ही संख्या ६ हजार ४६९, अहमदनगर जिल्ह्यात ६ हजार १९२, ठाणे जिल्ह्यात ६ हजार ७० तर मुंबई महापालिका क्षेत्रात ४ हजार ५०१ इतकी आहे.
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील