मुंबईत ८१ टक्के कोरोना रुग्ण बरे

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू घटत असल्याचं आता दिसून येत आहे. मंगळवारी मुंबईत नवीन ११४२ रुग्ण आढळले. तर १५९६ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत मुंबईत एकूण रुग्णांपैकी ८१ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. मुळं करोना रुग्णांचा आकडा १ लाख ४६ हजार ९४७ इतका झाला आहे.

मुंबईतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४६ हजार ९४७ झाली आहे. यामधील १ लाख १८ हजार ८६४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर ८१ टक्के झाला आहे. सध्या मुंबईत २० हजार ०६५ इतके अॅक्टिव्ह रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, मुंबईत रुग्ण दुपट्टीचा कालावधी ८० दिवसांवर गेला आहे.रुग्ण वाढीचा दरही घटला आहे. २५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्टदरम्यान मुंबईत करोना रुग्ण वाढीचा दर ०.८७ टक्के राहिला आहे.  

मुंबईतील कोरोना मृतांचा आकडा ७ हजार ६९० वर गेला आहे. तर, मुंबईत आतापर्यंत ७ लाख ७५ हजार ९७४ कोरोनाच्या चाचण्या झाल्या आहेत. मुंबईत ५७७ कंटेन्मेंट झोन म्हणून पालिकेनं घोषित केले आहेत. तर मुंबईतील ६ हजार २९३ इमारती सील करण्यात आल्या आहेत.


हेही वाचा -

सर्वाधिक कोरोनाच्या चाचण्या करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश

खासगी रुग्णालयात राखीव खाटा ठेवण्यास ३ महिन्यांची मुदतवाढ


पुढील बातमी
इतर बातम्या