नवी मुंबईत बुधवारी कोरोनाचे नवीन ८४ रुग्ण

नवी मुंबईत बुधवारी (३० डिसेंबर) कोरोनाचे नवीन ८४ रुग्ण सापडले आहेत. तर २ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ५० हजार ९३५ झाली आहे. 

बुधवारी नवी मुंबईमध्ये आढळलेल्या रुग्णांमध्ये बेलापूर १२, नेरुळ १६, वाशी १२, तुर्भे ८, कोपरखैरणे ८, घणसोली १२, ऐरोली १२ , दिघा येथील ४ रुग्णांचा समावेश आहे. तर ५९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

बेलापूर १७, नेरुळ ३०, वाशी ९, तुर्भे ७, कोपरखैरणे ६, घणसोली ६, ऐरोलीतील ७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४८, ९७२ झाली आहे. तर मृतांचा आकडा १०५० झाला आहे. नवी मुंबईत सध्या ९१३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ९६ टक्के झाला आहे. 

नवी मुंबईत नवीन रुग्ण कमी होत असताना बरे होणाचं प्रमाणही वाढत असल्याने कोरोनामुक्तीचा दर ९६ टक्क्यांवर पोहोचला आहे.सद्या कोरोनाचे फक्त ९१३ रुग्ण आहेत. त्यातील दोनशे रुग्ण हे वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्रात तर दोनशे रुग्ण नेरुळ येथील डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालयात उपचार घेत आहेत व शंभर रुग्ण हे खासगी रुग्णालयात असून निम्मे रुग्ण हे गृह अलगीकरणात आहेत

नवी मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या आता घटत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे पालिकेने शहरातील सर्व विभागांत उभारलेली १२ काळजी केंद्र टप्प्याटप्प्याने बंद केली आहेत. वाशी येथील पालिका रुग्णालयही सामान्य केले असून आता वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्रात उपचार होणार आहेत. तर अत्यवस्थ रुग्णांसाठी डॉ.डी.वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुविधा सुरू ठेवण्यात आली आहे.


हेही वाचा -

मुंबईच्या वेशीवर दोन महिन्यांनंतर फास्टॅग बंधनकारक

फायर बाईकसाठी पालिकेची निविदा, निमुळत्या जागेसाठी सोईस्कर


पुढील बातमी
इतर बातम्या