राज्यात शुक्रवारी ८७५३ नवीन कोरोना रुग्णांचं निदान झालं आहे. तर ८३८५ रुग्ण बरे झाले आहेत. तसंच १५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आतापर्यंत एकूण ५८,३६,९२० रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.०१ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के इतका आहे.
राज्यात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ४,२०,९६,५०६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६०,७९,३५२ (१४.४४ टक्के) नमने पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात ६,२४,७४५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर ४,४७२ व्यक्ती सांस्थातमक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील
ठाणे मंडळ एकूण १९५१
नाशिक मंडळ एकूण ६३७
पुणे मंडळ एकूण २३५६
कोल्हापूर मंडळ एकूण ३३०६
औरंगाबाद मंडळ एकूण १४६
लातूर मंडळ एकूण १६४
अकोला मंडळ एकूण ८८
एकूण ८७५३
हेही वाचा-
जुलै महिन्यात ९६ ते १०६ टक्के पावसाचा अंदाज