राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत रोज मोेठी वाढ होत आहे. गुरूवारी राज्यात तब्बल १४ हजार ३१७ नवीन रुग्ण आढळले आहेत. रुग्णसंख्या वाढत असल्याने अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही वाढत आहे. देशात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. राज्यात सध्या कोरोनाचे १ लाख ६ हजार ७० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
गुरूवारी ७ हजार १९३ रुग्णांना घरी सोडण्यात आलं. तर ५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईत १ हजार ५०८ कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर ९११ बरे झाले असून ४ मृतांची नोंद झाली आहे. मुंबईतील रुग्णांचा एकूण आकडा ३ लाख ३८ हजार ६४३ वर गेला आहे. तर मृतांचा आकडा ११ हजार ५१९ झाला आहे.
राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता २२ लाख ६६ हजार ३७४ वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा ५२ हजार ६६७ झाला आहे. राज्यातील सध्याचा मृत्यूदर २.३२ टक्के इतका आहे.
देशात गुरूवारी २३,२८५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून ११७ कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यासह देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता १,१३,०८,८४६ वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा १,५८,३०६ इतका झाला आहे. गुरूवारी १५,१५७ जण कोरोनामुक्त झाल्याने देशात आतापर्यंत १,०९,५३,३०३ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर सध्या १,९७,२३७ जण कोरोनावर उपचार घेत आहेत.