"सीरमसाठी भावनिक क्षण", पुनावाला यांनी शेअर केला टीमसोबत फोटो

पुण्याच्या सीरम इनस्टिट्यूटमधून लसीच्या वाहतुकीला सुरुवात झाली आहे. सीरम इनस्टिट्यूटचे अदर पुनावाला यांनी काही फोटो शेअर करत आपल्यासाठी हा भावनिक क्षण असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

कोव्हिशिल्ड लसीची पहिली मालवाहतूक देशातील विविध ठिकाणी पाठवण्यात येत आहे. सीरम इनस्टिट्यूटच्या संपूर्ण टीमसाठी हा एक भावनिक क्षण आहे, अशी पोस्ट सीरम इनस्टिट्यूटचे अदर पुनावाला यांनी लिहिलं आहे.

विशेष म्हणजे या पोस्टसोबत अदर पुनावाला यांनी सीरम इनस्टिट्यूटच्या संपूर्ण टीमचा एक फोटो पोस्ट केला आहे. तसंच दुसऱ्या एका फोटोत स्वत: अदर पुनावाला हे कोरोना लस ठेवण्यात आलेल्या ट्रकमध्ये बसलेले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही उत्पादन खर्चावर कोरोना लस उपलब्ध करून दिली असल्याचं सांगितलं. देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत कोरोना लस पोहोचवण्याचा उद्देश असल्याचंही अदर पुनावालांनी सांगितलं.

२०२१चे वर्ष आपल्यापुढील आव्हानात्मक वर्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पहिले १० कोटी डोस २०० रुपयांना देण्यात येणार आहेत. देशातील प्रत्येक व्यक्ती, गरीब, आरोग्य कर्मचाराी आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांच्यापर्यंत लस पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचंही पुनावाला म्हणाले.

दक्षिण आफ्रिका, दक्षिण अमेरिकेमध्ये लसीचा पुरवठा करण्याचा प्रयत्न असल्याचंही पुनावालांनी सांगितलं. सीरम इनस्टिट्यूटमधून आज सकाली तीन ट्रकमधून कोविशील्ड लस पुणे विमानतळावर पोहोचली. तिथून कोविशील्ड लस देशभरात पोहोचवण्यात येत आहे.देशातील १३ ठिकाणांवर लस पोहोचवली जाणार आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या