मुंबईत 'ही' ४ ठिकाणं बनली कोरोनाची हॉटस्पॉट

मुंबईत कोरोनाचा उद्रेक झाला आहे. रोज वाढणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. रविवारी मुंबईत तब्बल ११ हजार १६३ नवे रुग्ण आढळले आहेत. रुग्ण वाढीचा सरासरी दर आता १.६१ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत आता कोरोनाचे ४ हाॅटस्पाॅट झाले आहेत. या ठिकाणी रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.

अंधेरी पूर्व-पश्चिम, गोरेगाव, वांद्रे पश्चिम आणि चेंबूर हे नवीन कोरोनाचे हाॅटस्पाॅट ठरू लागले आहेत. अंधेरी ते बोरिवलीपर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. सुरुवातीला चेंबूर, गोवंडी, वांद्रे या विभागांमध्ये रुग्ण वाढ अधिक होती. मात्र आता सर्वाच विभागांमध्ये रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.

फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मुंबईत रुग्णसंख्या वेगाने वाढण्यास सुरूवात झाली. रविवारी तब्बल ११ हजार १६३ मुंबईकरांना कोरोनाची बाधा झाली. तर २५ रुग्णांचा मृत्यू झाला.

रुग्ण संख्या वाढत असल्याने रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी अवघ्या ४४ दिवसांवर आला आहे. गोरेगाव विभागात हा कालावधी ३३ दिवस, वांद्रे पश्चिम येथे ३४ दिवस, अंधेरी पूर्व - जोगेश्वरी येथे ३७ दिवस, चेंबूर - गोवंडी विभागात ३७ दिवस आणि अंधेरी पश्चिम येथे ३८ दिवस आहे.

सध्या अंधेरी पश्चिम (के पश्चिम) मध्ये सर्वाधिक ४८४९ सक्रीय रुग्ण आहेत. तर अंधेरी पूर्व - जोगेश्वरीत (के पूर्व) ४१७१1, आर मध्यमध्ये ३५४९, आर दक्षिणमध्ये ३४८४, पी उत्तरमध्ये ३४२३ सक्रीय रुग्ण आहेत

मुंबईत सील करण्यात आलेल्या सर्वाधिक १६७ इमारती अंधेरी पश्चिम विभागात आहेत. त्यापाठोपाठ परळ विभागात ८३, ग्रँट रोड- मलबार हिल येथे ७९, चेंबूर - गोवंडी परिसरात ५९ आणि भायखळा परिसरात ५७ इमारती सील आहेत.


हेही वाचा

कोरोनाग्रस्तांनी मदतीसाठी 'वॉर्ड वॉर रूम'शी संपर्क साधावा

महाराष्ट्रात कठोर निर्बंध; शुक्रवार ते सोमवार संपूर्ण लॉकडाऊन


पुढील बातमी
इतर बातम्या