लसीकरणाच्या माहिती संकलनासाठी 'ॲप'

मुंबईसह राज्यावर कोरोनाचं (coronavirus) सावट असून, यावर अद्याप कोणतही औषध (medicine) उपलब्ध नाही. परंतू, संपुर्ण जग कोरोना लस (corona vaccine) बनविण्यात व्यस्त आहे. लवकरात योग्य लस उपलब्ध होऊन नागरिकांना या आजारतून सुखरूप बाहेर काढण्यासाठी सर्वत्र प्रयत्न सुरू आहेत. कोरोनावरील लस ही प्राधान्यानं फ्रंटलाइनवर काम करणाऱ्या आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.

यासाठी राज्यात जिल्हा पातळीवर खासगी व सरकारी सेवेतील आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे. ही सर्व माहिती लवकरच राज्य शासननिर्मित एका विशेष ॲपमध्ये (app) संकलित करण्यात येणार आहे. या ॲपचं काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आरोग्य विभागानं (health department) स्पष्ट केली आहे.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात हे ॲप येणार असून यात जिल्हा पातळीवरून माहिती अपलोड करण्यात येणार आहे. या ॲपमध्ये लसीचा डोस, पुन्हा देण्यात येणारा डोस आणि लसीचं वेळापत्रक असणार आहे. ॲपमध्ये संकलित करण्यात येणाऱ्या सर्व माहितीची उपलब्धता केंद्र सरकारकडंही असणार आहे. ॲप अखेरच्या कोडिंग टप्प्यात आहे. लवकरच ते कार्यान्वित करण्यात येणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या