एसटी स्थानकात जेनेरिक औषधांची दुकानं

मुंबई - राज्यातील एसटी स्थानकात आता जेनेरिक औषधांची दुकानं सुरू करण्यात येणारायेत. त्यानुसार राज्यात 500 जास्त एसटी स्थानकात जेनेरिक औषधं उपलब्ध करुन दिली जाणारायेत. एसटी महामंडळाच्या बैठकीमध्ये या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळालाय. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ही कल्पना सुचवली. "ही योजना पूर्णपणे राबवण्यासाठी पाच ते सात महिने जातील," अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मुंबई लाइव्हच्या टीमला दिली.

देशभरामध्ये जेनेरिक औषधांची विक्री सुरू आहे. मात्र राज्यामध्ये 200 ते 300 जेनेरिक औषधांची दुकाने आहेत. त्यामुळे गोरगरिबांना स्वस्त दरामध्ये औषधं मिळतं नाहीत. एसटीमधून प्रवास करणारे प्रवासी मध्यमवर्गीय आणि गरीब असतात. त्यांना स्वस्त दरात औषधं मिळावी यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे

पुढील बातमी
इतर बातम्या