वडाळा लोहमार्ग पोलीस ठाण्यात आयुर्वेदावर मार्गदर्शन

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • आरोग्य

वडाळा - रेल्वे पोलीस मित्र आणि महिला समिती सदस्यांसाठी वडाळा रेल्वे स्थनाकात 10 डिसेंबरला 'आयुर्वेद' या विषयावर मार्गदर्शन शिबीर आयोजित केलं गेलं. लोहमार्ग पोलिसांच्या वतीनं वरिष्ठ पोलीस निरीक्षक आय. बी. सरोदे यांच्या नेतृत्वाखाली हे शिबीर आयोजित केलं होतं. यात प्रमुख वक्ते म्हणून आयुर्वेदिक तज्ज्ञ राकेश सरावगी उपस्थित होते.

मानवाच्या शरीरासाठी सकस आहार हा सर्वात उत्तम पर्याय आहे. मात्र या आहारात साध्या मिठाऐवजी सैंधव अथवा काळ्या मिठाचा वापर करावा, साखर ऐवजी काळा गूळ उपयुक्त आहे, खाद्यपदार्थांमध्ये मैद्याचा वापर करणं टाळावं, शुद्ध तेल आणि शुद्ध तुपाचा वापर करावा, तसंच अन्नपदार्थ शिजविण्यासाठी अॅल्युमिनियम आणि प्रेशरकुकर ऐवजी मातीच्या भांड्याचा वापर करावा. यामुळे कोणताही आजार आपल्या जवळ फिरकणार नाही. तसंच आपली पचनक्रिया सुधारेल असा सल्ला आयुर्वेदिक तज्ज्ञ राकेश सरावगी यांनी उपस्थितांना दिला.

पुढील बातमी
इतर बातम्या