उत्तम रुग्णसेवा, केईएम रुग्णालय भारतात ६ व्या‌ क्रमांकावर

महापालिकेच्या केईएम रुग्णालयाने चांगल्या सेवेसाठी भारतात ६ वा क्रमांक पटकावला आहे. 'द विक' या मॅगझिनने संपूर्ण भारतात केलेल्या सर्व्हेतून हे समोर आलं आहे.

'द विक नेल्सन' या मॅगझिनतर्फे दरवर्षी सर्व्हे केला जातो. २०१६ मध्ये केईएम रुग्णालय ९ व्या क्रमांकावर होते. पण, या वर्षी सर्व्हेत केईएम रुग्णालयाने तीन पायऱ्या वर चढत ६ वा क्रमांक मिळवला.

गेल्या वर्षी केईएम रुग्णालयाने सर्व्हेत ९ वा क्रमांक मिळवला होता. पण, यावर्षी रुग्णालय ६ व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे मी माझे सर्व कर्मचारी आणि हितचिंतकांचे आभार मानतो. आम्हाला या यशाबद्दल खूप आनंद होत आहे.

- डॉ. अविनाश सुपे, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय

केईएम रुग्णालयात दररोज जवळपास हजारोंच्या संख्येने रुग्ण दाखल होतात. त्यामुळे एवढ्या रुग्णांना सांभाळणं कठीण होतं. पण, आम्ही केलेल्या कामाची ही पोचपावती असल्याचंही डॉ. सुपे यांनी स्पष्ट केलं.

याशिवाय, केईएम पश्चिम भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्तम सरकारी रुग्णालय आहे. विविध आजार आणि औषधांवर संशोधन करणाऱ्या रुग्णालयांमध्ये केईएमचा पहिल्या दहा रुग्णालयांमध्ये समावेश होतो.

२०१६ मध्ये झाली केईएमला ९० वर्ष पूर्ण

२२ जानेवारी १९२६ मध्ये मुंबईत केईएम रुग्णालय आणि महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत रुग्णांच्या सोयीच्या दृष्टीने रुग्णालयात विविध बदल करण्यात आले आहेत. गेल्यावर्षी याच केईएम रुग्णालयाला ९० वर्ष पूर्ण झाली.

पुढील बातमी
इतर बातम्या