चेंबूरमध्ये सुरवंटांची धाड

चेंबूर - दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील चेंबूरच्या अनेक भागात सुरवंट किडयांनी थैमान घातले आहे. घराबाहेर, शाळेच्या आवारात आणि रुग्णालय परिसरातील भिंतीवर हे सुरवंटे पहायला मिळत आहेत. थंडीचा महिना सुरू होताच या महिनाची उत्पती वाढते. त्यामुळे गेल्या पाच सहा दिवसांपासून चेंबूरच्या घटला गाव, खारदेवनगर आणि चेंबूर कॅम्प परिसरात हे सुरवंटे मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यांच्या अंगावरील केस मुनष्याच्या त्वचेला लागल्यास खाज आणि त्वचा लाल होते. रहिवाशांनी याबाबत पलिकेला तक्रार दाखल करून फवारणी करण्याची विनंती केली आहे. मात्र, अदयापही पालिकेकडून फवारणी न झाल्याने या किड्यांची संख्या वाढत आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या