मुंबईत पक्ष्यांच्या मृत्यूच्या १७९५ तक्रारी

राज्यात बर्ड फ्लूचा फैलाव झाल्यापासून गेल्या दोन आठवड्यांत मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे शहरातील विविध भागातून पक्ष्यांच्या मृत्यूच्या १७९५ तक्रारी आल्या आहेत. या तक्रारी कावळे, कबूतर आणि इतर पक्ष्यांचा मृत्यू झाल्याच्या आहेत. मात्र, कोंबडीचा मृत्यू झाल्याची एकही तक्रार पालिकेकडे आलेली नाही.

बीएमसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, असे अनेक फोन कॉल असतात ज्यामध्ये एकाच मृत्यूचा अहवाल दिला जातो. त्यामुळे पक्ष्यांच्या मृत्यूपेक्षा तक्रारींचे प्रमाण जास्त आहे. आतापर्यंत मुंबईत बर्ड फ्लूच्या दोन मृत्यूची नोंद झाली आहे. तर राज्यात ६ हजाराहून  अधिक पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे भायखळा प्राणीसंग्रहालयाचे अधिकारी सतर्क आहेत. या प्राणीसंग्रहालयात २०० पेक्षा जास्त पक्षी आहेत. प्राणिसंग्रहालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, भायखळा प्राणीसंग्रहालयात, स्थलांतरित पक्ष्यांचे आणि इतर पक्ष्यांचे पिंजरे एकत्र ठेवलेले नाही. त्यामुळे आमच्याकडे बर्ड फ्लूची कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळली नाहीत.

दरम्यान,बर्ड फ्लूचा परिणाम मासे दरवाढीवर झाला आहे. बर्ड फ्लूच्या भीतीमुळे चिकन- मटण आणि अंड्यांची मागणी कमी झाली आहे. तर माश्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. बर्ड फ्लूमुळे माशांची मागणी वाढली आहे. मांसाहारी प्रेमींनी आता आपला मोर्चा माशांकडे वळवला आहे. माशांचे दर ५ ते १५ टक्क्याने वाढले आहेत.  


हेही वाचा -

आस्थापना पाठोपाठ सोसायट्यांना सीसीटीव्ही बंधनकारक

जे.जे. रुग्णालयात दिवसभरात १०० पैकी केवळ १३ जण लसीकरणास हजर


पुढील बातमी
इतर बातम्या