युरोपातील नव्या स्ट्रेनबद्दल पालिका गंभीर, टास्क फोर्सकडे मागितली माहिती

युरोपीय देशांमध्ये कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन आढळून आला आहे. त्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. बृहन्मुंबई महानगरपालिके (BMC) नं महाराष्ट्र कोविड-19 टास्क फोर्सला युरोपियन देशांमधील या नव्या स्ट्रेनबद्दल मनाहिती देण्याचं आवाहन केलं आहे.

अधिका-यांनी सांगितलं आहे की, यामुळे त्यांना यावर अधिक अभ्यास करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यास मदत मिळेल. शिवाय भारतात या स्ट्रेनचा प्रवेश झाल्यास काय करता येईल याची पूर्वतयारी देखील करणं सोपं जाईल.

नाताळच्या सुट्ट्यांच्या एक महिना अगोदर हा नवा स्ट्रेन समोर आला आहे. त्यात भारतानं १५ डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परवानगी दिली आहे. त्यामुळे भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे COVID-19 प्रकरणांमध्ये वाढ होऊ शकते.

पालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त (आरोग्य) सुरेश काकाणी म्हणाले की, तपशीलांच्या मदतीनं ते या प्रकाराविरूद्ध लस प्रभावी आहेत का ते तपासतील. काही नवीन प्रकार ज्यासाठी लस अप्रभावी आहे अशा बाबतीत ते मुंबईत इतर तयारी करतील.

ऑस्ट्रिया, नेदरलँड्स, यूके, जर्मनी आणि इटलीसारख्या देशांमध्ये गेल्या काही आठवड्यांत दैनंदिन प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.

सध्याच्या नियमांचं पालन करून, जर प्रवाशाचे पूर्ण लसीकरण झाले असेल, तर त्यांना RT-PCR चाचण्यांशिवाय विमानतळ सोडण्याची परवानगी आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. याशिवाय, सणासुदीचा हंगाम जवळ येत असताना, प्रत्येक नागरिकानं कोविड-१९ बाबत योग्य काळजी घ्यावी, यासाठी BMC नं प्रत्येक २४ वॉर्डांमध्ये दोन पथके स्थापन केली आहेत.


पुढील बातमी
इतर बातम्या