खासगी सोसायट्यांमध्ये सुरु होणार लसीकरण केंद्र

मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढीबरोबरचं लसीकरण मोहिमही वेगानं राबवली जात आहे. मुंबईतील खासगी रुग्णालय, सरकारी रुग्णालय, आणि पालिकेनं सुरु केलेल्या लसीकरण केंद्रांमध्येच नागरिकांना लस दिली जात आहे. परंतु, आता मुंबईतील खासगी सोसायट्यांमध्येही लसीकरण केंद्र सुरु करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. महापालिकेनं लसीचा साठा विचारात घेऊन खासगी रुग्णालयांना सोसायट्यांचा आवारात लसीकरण मोहिम सुरु करण्याची परवानगी दिली आहे.

या रुग्णालयांना महापालिकेनं लसीकरणासाठी ठरवून दिलेले प्रोटोकॉल पाळावे लागणार आहेत. तसंच, खासगी रुग्णालयांसाठी सरकारनं ठरविलेल्या किंमतीवर या लसी सोसायटीतील सदस्यांना मिळणार आहेत. यासंदर्भात काही गृहनिर्माण संस्थांनी यापूर्वीच पालिकेशी चर्चा केली आहे, तर काही सोसायट्या लसीकरणासाठी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

हाऊसिंग सोसायट्या, औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या, बँका आणि कॉर्पोरेट्स क्षेत्रातील कंपन्यांतील कर्मचाऱ्यांसाठी खासगी रुग्णांसह टायअप करत खाजगी लसीकरण केंद्र सुरु करु मशकतात. महापालिकेनं आत्तापर्यंत ७५ पेक्षा अधिक खासगी रुग्णालयांना सोसाट्यांमध्ये लसीकरण केंद्र उभारण्याची परवानगी दिली असून, यात अजून रुग्णालयांची भर पडणार आहे. खासगी रुग्णालयांना लसीकरणादरम्यान संबंधित सोसायट्यांमधील नागरिकांची लसीकरणानंतर डॉक्टरांचा निरीक्षणाखाली ठेवत योग्य काळजी घ्यावी लागणार आहे. महापालिकेनं लसीकरणासाठी ठरवून दिलेल्या नियमांचं योग्य पालन करावं लागणार आहे.

ज्या नागरिकांना मोफत लस हवी आहे अशांसाठी महापालिकेनं २२७ नवीन केंद्रं सुरु केली आहेत. परंतु या केंद्रावर पुरेसा लसीचा साठा उपलब्ध झाल्यानंतर नागरिकांना विनामूल्य लस मिळणार आहे. लोढा ग्रुपनं आपल्या प्रकल्पांतील अनेक सोसायट्यांमध्ये खासगी रुग्णालयांच्या माध्यामातून लसीकरण मोहिम सुरु करण्याची तयारी सुरु केली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या