दादरमधील मेडिकल लॅबमध्ये १२ जणांना कोरोना; महापालिकेकडून लॅब सील

Brihanmumbai Municipal Corporation (BMC) recently sealed a lab in Mumbai’s Dadar (West). Image: Twitter/ANI
Brihanmumbai Municipal Corporation (BMC) recently sealed a lab in Mumbai’s Dadar (West). Image: Twitter/ANI

मुंबईत कोरोनाच्या प्रादुर्भावात पुन्हा एकदा वाढ होताना पाहायला मिळत आहे. मुंबईतील अनेक भागांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईतल्या गजबजलेला परिसर असलेल्या दादर परिसरातील एका मेडिकल लॅबमध्ये १२ जणांना कोरोनाची लागण झाली. एकाच लॅबमध्ये इतक्या जणांना कोरोनाची लागण झाल्यानं ही लॅब सील करण्यात आली आहे.

मुंबईतल्या दादरमधील मेडिकल लॅब महापालिकेकडून सील करण्यात आली आहे. या सगळ्या घटनेमुळं पालिका प्रशासनाची झोप उडाली आहे. कारण या लॅबमध्ये चाचणीसाठी आलेल्यांना शोधण्याचं आव्हान महापालिकेसमोर आहे.

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ऑमिक्रॉनचा धोका ही वाढला असून, मुंबईत अनेकांना ऑमिक्रॉनची बाधा झाल्याचं समजतं. महाराष्ट्रात एकाच दिवसात ३१ नव्या ऑमिक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंतची ही एका दिवसातील सर्वाधिक रुग्ण संख्या आहे.

या ३१ नव्या प्रकरणांपैकी २७ रुग्ण एकट्या मुंबईत आढळून आले आहेत. तर २ जण ठाण्यात, १ जण पुण्यात आणि एक जण अकोल्यात आढळून आला आहे. याच बरोबर आता राज्यातील ऑमिक्रॉन बाधितांचा एकूण आकडा १४१ वर पोहोचला आहे. त्याचवेळी मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९२२ नवे रुग्ण आढळून आले असून २ जणांचा मृत्यू झाला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या