मुंबईतल्या 'या' वॉर्ड्समध्ये कोरोनाच्या १००० चाचण्या घेण्याचे आदेश

महानगरपालिका आयुक्त इकबालसिंग चहल यांनी २४ वॉर्डपैकी ९ वॉर्डमध्ये कोरोनाव्हायरससाठी दररोज हजार चाचण्या घेण्याचे आदेश दिले आहेत. तर उर्वरित प्रभागांना दररोज ४०० चाचण्यांचे लक्ष्य देण्यात आले आहे. दोन पद्धतीनं या चाचण्या घेण्यात येतील.

पालिकेनं दिलेलं चाचण्यांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी दोन प्रकारच्या चाचण्या घेण्यात येणार आहेत. अँटिजेन आणि आरटी-पीसीआर चाचण्या घेण्यात येणार आहे. व्हीडिओ कॉन्फरन्सिंगवरून प्रभाग अधिकाऱ्यांसोबत नुकत्याच झालेल्या बैठकीत हे आदेश देण्यात आले.

दरम्यान, सेरो सर्वेचा दुसरा टप्पा पालिकेतर्फे सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत कोरोनाव्हायरसच्या प्रसाराचा आणि या रोगाविरूद्ध नागरिकांमध्ये किती अँन्टीबॉडिज विकसित झाल्या आहेत याचा अभ्यास सेरो सर्वेनं करता येत आहे. या सर्वेक्षणात एफ-उत्तर (दादर, माटुंगा आणि धारावी), एम-वेस्ट (देवनार आणि गोवंडी) आणि आर-उत्तर (दहिसर) प्रभागांचा समावेश आहे.

जुलैच्या पहिल्या सहामाहीत झालेल्या सेरो सर्वेमध्ये ३ वॉर्डमधील झोपडपट्टीतील लोकसंख्येपैकी ५७ टक्के आणि गैर-झोपडपट्टी रहिवाशांपैकी १६ टक्के लोकांमध्ये अँन्टीबॉडीज विकसित झाल्याचं समोर आलं आहे. त्याच भागामध्ये कोरोनाव्हायरस संसर्गाची लक्षणं दिसण्याचं प्रमाण जास्त आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या