पालिका मुंबईतील 'ही' ३ कोविड सेंटर करणार बंद

(Representational Image)
(Representational Image)

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)नं तिची तीन जंबो कोविड केअर सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सद्यस्थिती पाहता चौथ्या लाटेची शक्यता फेटाळून लावताना ही माहिती दिली.

राजेश टोपे यांनी जरी शक्यता फेटाळून लावली असलं तरी पालिका मुंबईतील सहा केंद्रे स्टँडबायवर ठेवणार असल्याचेही समोर आले आहे.

वृत्तानुसार, BMC गोरेगाव (NESCO), कांजूरमार्ग आणि दहिसर चेक नाका केंद्रे बंद करणार आहे. यातील औषधे आणि उपकरणे बीएमसीच्या 16 श्रेणीसुधारित रुग्णालयांमध्ये वापरली जातील.

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होता होता आता एक नवीन आजाराचा धोका वाढला आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं सर्व राज्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार राज्य सरकार आणि पालिकेनं काही निर्देश दिले आहेत.

  • गेल्या 21 दिवसांत प्रभावित देशांमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व संशयित रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.
  • या संशयित रुग्णांची माहिती स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीने आरोग्य विभागाला देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
  • अशा रूग्णांवर उपचार करताना सर्व संसर्ग नियंत्रण पद्धती पाळल्या पाहिजेत.
  • रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू केले जाईल.
  • रक्ताची थुंकी आणि संशयित रुग्णांचे नमुने एनआयव्ही पुणे येथे तपासणीसाठी पाठवले जातील.
  • गेल्या 21 दिवसात रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांना ताबडतोब ओळखावे लागेल आणि त्यांना क्वारंटाईन करावे लागेल.

हेही वाचा

मंकीपॉक्ससाठी पालिकेची तयारी, रुग्णांसाठी उभारला स्वतंत्र वॉर्ड

पुढील बातमी
इतर बातम्या