३ रुग्णालयांचा बदलणार चेहरामोहरा, पालिकेकडून २७५ कोटींचा खर्च

मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) वांद्रे पश्चिम (Bandra West) येथील भाभा रुग्णालय (Bhabha Hospital), घाटकोपर (ghtkopar) चे राजावाडी रुग्णालय (Rajawadi Hospital) आणि  मुंबई सेंट्रल (Mumbai Central) येथील नायर रुग्णालय (Nair Hospital)  आदी रुग्णालयांचा आता चेहरामोहरा बदलणार आहे. तिन्ही रुग्णालयांची डागडुजी, विस्तार आणि अंतर्गत दुरुस्त्या केल्या जाणार आहेत. यासाठी मुंबई महापालिका २७५ कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. आगामी काळात रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी पालिका इतका मोठा खर्च करणार आहे. 

भाभा रुग्णालयाचा विस्तार केला जाणार आहे. तसंच नवीन सुविधांसह नवीन १२ मजली इमारत बांधली जाणार आहे. तर नायर रुग्णालय (Nair Hospital) आणि राजावाडी रुग्णालयांच्या (Rajawadi Hospital) इमारतींमध्ये अंतर्गत दुरुस्त्या केल्या जाणार आहेत. त्यामुळे या रुग्णालयांच्या  चेहरामोहरा बदललेला दिसेल. मुंबईत पालिकेची केईएम, सायन, नायर, कुपर या प्रमुख रुग्णालयांसह १६ उपनगरीय रुग्णालये आहेत. पालिका अर्थसंकल्पात आरोग्यासाठी ४ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रुग्णालयांच्या दैनंदिन वैद्यकीय सेवेसोबतच रुग्णालय इमारतींच्या देखभालीचा व नवीन बांधकामांचाही खर्च यात समाविष्ट आहे. 


वांद्रे पश्चिम येथील भाभा रुग्णालयाचं (Bhabha Hospital) विस्तारीकरण करण्यात येणार आहे. या ठिकाणची जुनी ओपीडी (opd) पाडून दोन बेसमेंट, तळमजला आणि १२ मजली इमारतीचे बांधकाम केले जाणार आहे. याशिवाय मुख्य रुग्णालयाच्या तळमजला आणि दहा मजल्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. भाभा रुग्णालय  ४७९ खाटांचे आहे. प्रस्तावित रुग्णालय इमारतीचे आराखडे न संरचनात्मक नकाशे मे. स्कायलाइन आर्किटेक्ट्स यांनी बनवले आहेत. नायर रुग्णालयातील जी टाइप इमारतीच्या दुरुस्तीसाठी मे. शशांक मेहंदळे आणि असोसिएट्स यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 


हेही वाचा -

राज्यभरात मुंबई सर्वाधिक प्रदूषित शहर

मुंबईच्या झेन सदावर्तेला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार


पुढील बातमी
इतर बातम्या