केअर 24चा मदतीचा हात

  • रेणुका गरकल & मुंबई लाइव्ह टीम
  • आरोग्य

मुंबई - एकदा माणूस अंथरुणाला खिळला की त्याच्या गरजा पूर्ण करता करता कुटुंबियांच्या नाकी नऊ येतात, त्यांची दमछाक होते, काही दिवस कुटुंबीय आपल्या जिवलगांवर असलेल्या प्रेमापायी सगळं करतातही. पण जर तुम्ही मुंबईसारख्या शहरात राहात असाल आणि त्यात तुम्ही नोकरी करत असाल तर मात्र हे सगळं करणं खूपच कठीण होऊन बसत. मग गरज पडते ती एका मदतीच्या हाताची, जो तुमच्या जिवलगांच्या सर्व गरजा तेवढ्याच आस्थेने, अगदी न चुकता पूर्ण करेल. मग त्याला वेळेवर औषध द्यायचं असो की त्याला रोज अंघोळ घालणं असो. कोणतंही काम हा मदतनीस अगदी न चुकता करेल.

केअर 24 ही अशी संस्था आहे जी गरजू कुटुंबांना अशा प्रकारचे मदतनीस पुरवते. डिमेंशियाने ग्रस्त 66 वर्षांची रेणुका मेहरा ही गेल्या कित्येक वर्षांपासून व्हील-चेअरवर खिळली आहे. तिचे पती आणि सून निकीता हे रेणुकाची काळजी घ्यायचेच. पण निकीताच्या कामाच्या वेळामुळे तिची दमछाक व्हायची. मात्र केअर 24 च्या मदतीने त्यांना मिळाली चारुलता शिंदे नावाची मदतनीस. जिच्या मदतीने रेणुकाच्या देखरेखीत कोणतीही कमी न येता निकीतावरील ताणही कमी झाला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या