गरिबांना केंद्र सरकारनं मोफत लस द्यावी- राजेश टोपे

राज्यातील दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना कोरोना लस मोफत द्या, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरणार आहे. याबाबत केंद्रानं योग्य निर्णय न घेतल्यास राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील, असंही त्यांनी म्हटलं. 

गरिबांना मोफत लस देण्यासाठी केंद्र सरकारकडं आग्रह धरणार आहोत. दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना कोरोनाची लस मिळावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राजेश टोपे यांनी म्हटलं. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन कर्मचारी, दीर्घकालीन आजार असलेले ५० वर्षांवरील रुग्ण अशा जवळपास ३ कोटी जणांना कोरोनाची लस दिली जाणार आहे.

लॉकडाऊनमध्ये गरिबांचे आर्थिक गणित बिघडलं आहे. त्यामुळं गरिबांना लशीच्या दोन कुप्यांसाठी ५०० रुपये लादणं योग्य ठरणार नाही. त्यामुळं केंद्र सरकारनं हा खर्च उचलावा. केंद्र सरकारनं हा खर्च केला नाही तर राज्य सरकारच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील. राज्य सरकारच्या राज्याच्या अखत्यारित येणाऱ्या लोकांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही, असा विश्‍वासही टोपे यांनी व्यक्त केला.

पुढील बातमी
इतर बातम्या