मुंबईत चिकनगुनियाचे रुग्ण

मुंबई - मुंबईत चिकनगुनियाचे 4 रुग्ण आणि 20 संशयित रुग्ण आढळलेत. त्यामुळे आता मुंबईकरांमध्ये डेंग्यू, मलेरिया, लेप्टोसह चिकुनगुनियाच्या आजाराची भिती निर्माण झालीय. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घेण्याचे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वैद्यकीय कार्यकारी अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी केलंय. चिकनगुनिया हा एक विषाणूजन्य रोग असून एडीस इजिप्ती डासांच्या चाव्यामुळे चिकनगुनियाचा ताप येतो. डेंग्यूसारखीच या आजाराची लक्षणे आहेत.

चिकनगुनियाची लक्षणं

ताप येणे

3 ते 5 दिवस ताप राहतो

सांधेदुखी

तोंड, पाठ, पोटावर पुरळ उठणे

स्नायू, कंबर, डोकेदुखी

उजेडाकडे पाहताना डोळ्यांना त्रास होणे

काय काळजी घ्याल ?

पाण्याच्या टाक्या साफ ठेवा

ड्रम पाण्याच्या टाक्या झाकून ठेवणे

फुलदाणी, कुलर, एसीमधील पाणी नियमित बदलणे

भरपूर पाणी पिणे.

पुढील बातमी
इतर बातम्या