मुंबई - मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात अत्याधुनिक उपकरणांची खरेदी करण्यात येत असली तरी कोणत्या
या उपकरणांच्या उपलब्धतेची माहिती संगणकीय पद्धतीने तत्काळ उपलब्ध व्हावी, तसंच त्यांचं परिक्षण करणं सुलभ व्हावं, यादृष्टीने या सर्व उपकरणांवर स्टीकर पद्धतीचे आरएफआयडी टॅग बसवण्यात येणार आहेत.
आरएफआयडी हे 'बारकोड' पेक्षा अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. यानुसार साधारणपणे 15 हजार जैव वैद्यकीय उपकरणांवर आरएफआयडी टॅग बसविण्यात येणार असल्याची माहिती मध्यवर्ती खरेदी प्राधिकरणाने दिली आहे. या टॅगमध्ये जैव वैद्यकीय उपकरण ज्या रुग्णालयात असेल त्या रुग्णालयाचे आणि संबंधित विभागाचे नाव, उपकरणाचे नाव, उत्पादकाचे नाव, मॉडेल, खरेदी दिनांक, किंमत, हमी कालावधी, परीक्षण इत्यादी 15 मुद्यांचा तपशील असणार आहे. यानुसार साठविलेली माहिती ही आरएफआयडी रीडरद्वारे वाचणं शक्य असणार आहे. ही सर्व माहिती एकत्रित पद्धतीने मध्यवर्ती संगणकावर उपलब्ध असणार आहे.