नवी मुंबईत 'ह्या' ७ खासगी केंद्रांवर लसीकरण

नवी मुंबईत गुरुवारपासून अकरापैकी सात खासगी केंद्रांवर कोरोना लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. आधी फक्त पालिकेच्या तीन केंद्रांवरच लसीकरण सुरू होतं. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. 

दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरण १ मार्चपासून सुरू करण्यात आलं आहे, मात्र नवी मुंबई फक्त पालिकेच्या तीन केंद्रांवरच लसीकरण सुरू होतं. महापालिकेच्या वाशी, नेरुळ, ऐरोली या तीन रुग्णालयात ऑनलाइन तसेच ‘वॉक इन’ पध्दतीने लसीकरण सुरू आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होतं. आता सात खासगी केंद्रांवर लस देण्यात येत आहे.  

पालिकेच्या लसीकरण केंद्रांवर बुधवारी २६४ जणांना लस देण्यात आली. आतापर्यंत एकूण  ५२८ जणांना लस देण्यात आली आहे. ऑनलाइन अ‍ॅपवर नोंदणी करण्यात आलेल्यांनाच लस देण्यात येणार असून नोंदणी न केलेल्योनी लसीकरणास न येण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. मंगळवारी पालिकेने खासगी ११ रुग्णालयातील आरोग्यकर्मींना प्रशिक्षण दिले होते.परंतू त्यातील बुधवारी सात रुग्णालयांनी लशींचे पैसे शासनाकडे भरले आहेत. चार रुग्णालयांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली  नाही. 

या ठिकाणी लसीकरण

- डॉ.डी.वाय पाटील रुग्णालय, नेरुळ

- डिव्हाइन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल

- मंगलप्रभू नर्सिग होम,जुईनगर

- आचार्य श्रीज्ञानेश हॉस्पिटल, नेरुळ

- डॉ.आर.एन.सुरज हॉस्पिटल, सानपाडा

- एमपीसीटी हॉस्पिटल, सानपाडा

- सुयश हॉस्पिटल, सीवूड्स

पुढील बातमी
इतर बातम्या